न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२२) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाच्या वतीने पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील अनेक अनधिकृत फ्लेक्स क्रेनद्वारे मंगळवारी (दि. १) हटविण्यात आले.
शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने दापोडी ते निगडी या मार्गावर ग्रेडसेपरेटर, पादचारी मार्ग, सीमा भिंत, चौकात लावलेले अनेक फ्लेक्स हटविण्यात आले. उंचावरील स्वागत कमानीवरील फ्लेक्स काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.














