न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भोसरी येथील सहल केंद्राजवळील जलतरण तलाव ऐन उन्हाळ्यात बंद आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या कारणामुळे सर्व जलतरण तलाव बंद होते. परंतु एप्रिल २२ पासून सर्व निर्बंध हटविल्यानंतर शहरातील जलतरण तलाव सुरु झाले आहेत. परंतु, भोसरीतील तलाव अद्याप बंद आहे?
तलावाच्या बाहेरील गेटवर बंद असण्याबाबत कोणतेही कारण लिहिलेले नाही. तलाव बंद असल्यामुळे भोसरी परिसरातील नागरिकांना, लहान मुलांना व जलतरण पटू यांना पोहण्याच्या आनंदापासून मुकावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने यात लक्ष घालून भोसरीतील हा तलाव सुरु करून तो सुस्थितीत व सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अॅड. सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.