- संस्थापक अध्यक्ष अमित गोरखेंकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या नोव्हेल ज्युनियर कॉलेजचा 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा एसएससी बोर्डाच्या परीक्षेत 100 % निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी अभिनंदन केले आहे.
विज्ञान शाखेतून प्रथम समीर वानखेडे (94.83 %), व्दीतीय दर्शन सेठिया (90.67 %), तृतीय ओंकार साखरे (90 %), वाणिज्य शाखेतील प्रथम साक्षी सिंग (90.17 टक्के), व्दीतीय श्रेया उत्तेकर (88.83 %), तृतीय कोंढाळकर मधुरा (88.5 %), कन्ननथारा रोहित (88.5 %) यांनी प्राविण्य मिळवले आहे. तर, विषयाप्रमाणे विज्ञान शाखेतून इंग्रजी विषयात आयशा शेख (85 % ), भौतिकशास्त्र समीर वानखेडे (96),. रसायनशास्त्र समीर वानखेडे (97) समीर वानखेडे (99 %) जैविकशास्त्र मयुरी घोरबंद (96), प्रांजल अजिवल (96), भूगोल धीरज चौधरी (95), माहिती तंत्रज्ञान देवकी पाटील (96) यांनी यश संपादन केले. तर, वाणिज्य शाखेतील विषयांमध्ये इंग्रजीत कनिष्क राजपूत (85), अर्थशास्त्र साक्षी सिंग (93), मुस्कान शेख (93), साक्षी सिंग (98), ओसीएम सागर सुतार (92), मधुरा कोंढाळकर (92), एसपी श्रेया उत्तेकर (93), गणित वरद पोतदार (93), आयटी रोहित कन्नथरा (98) यांनी यश संपादन केले.