न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर झाली असून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी अश्विनी चंद्रकांत तापकीर यांच्यावर देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, पुणे जिल्हाध्यक्ष पुनमताई नागवडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.
चिंचवड महिला अश्विनी तापकीर यांनी संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून काळेवाडी रहाटणीच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात काम केले आहे. यापूर्वी भाजपमध्ये असतानाही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले नाही तर काळेवाडी, रहाटणी परिसरात सातत्याने विविध उपक्रम राबवत नागरिकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांच्या आजवरच्या कामाचा आलेख पाहता राष्ट्रवादी महिला काँग्रेसने त्यांच्यावर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तापकीर या या पदाच्या माध्यमातून शहरभर पक्ष संघटना वाढविण्याचे कार्य करतील असा विश्वास पक्षाश्रेष्टीने व्यक्त केला आहे. तर अश्विनी तापकीर या स्वतः प्रभाग क्रमांक ३२ मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या पदाचा त्यांना मोठा फायदा होवू शकतो.