- शहर मनसेचे आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात विविध प्रभागात अर्धवट स्थितीत रस्ते आणि विकासकाम आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही कामे रखडली आहेत. आयुक्त राजेश पाटील यांनी ही कामे त्वरित मार्गी लावण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक तथा शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावरच भले मोठे खड्डे पडलेत. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा असल्यामुळे रत्यावर राडारोडा पडून वाहने घसरून अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्धवट स्थितीतील विकासकामे मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा.