न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२२) :- दुचाकीवरून फिर्यादी हे कुदळवाडी येथे दुकानात जात असताना रामायण मैदानाजवळ असलेल्या आरोपीने फिर्यादीला बोलावून घेतले. तर दुसऱ्याने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यास फिर्यादीने नकार दिल्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केला.
तसेच इतर आरोपींनीही फिर्यादीला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. गुरुवारी (दि. २३) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अमनकुमार सुभाषचंद्र गौतम (रा. जाधववाडी, चिखली) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नावे आहे.
चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील पांडुरंग गायकवाड, दीपक मणिनराव हांडगे (दोघेही रा. चिखली), सोन्या फुलवरे, दिघ्या यांच्यावर गुन्हा दाखल आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.