न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील खासगी भंगार विक्रेत्यांचे दुकान व गोदामास आग लागल्यास ती विझविण्यासाठी एका आगीच्या बंबाच्या एका फेरीसाठी ३ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर शहराबाहेरील १० किलोमीटर अंतरापर्यंत हा दर ६ हजार रूपये असणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी गुरुवारी (दि. २३) मान्यता दिली.
शहरातील, चिखली-कुदळवाडी, थेरगाव तसेच, दापोडी, पिंपळे गुरव, भोसरी या भागात खासगी भंगार विक्रेते व त्यांचे गोदाम आहेत. तीथे आग लागल्यास पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या बंबाचे पाणी, इंधन व मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात खर्ची पडते.
भंगार विक्रेते व गोदाम व्यावसायिक हे अनधिकृत असल्याने पालिकेचा कोणताही कर भरत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. अशा भंगार दुकाने व गोदामाची आग विझविण्यासाठी विधी समितीने एका आगीच्या बंबाच्या फेरीसाठी ५ हजार रूपये तर आगीसाठी १० हजार रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता.