न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२२) :- पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. बेकायदेशीर कच्चे रसायन गुळमिश्रित लावून हातभट्टीची दारू तयार करीत असताना आरोपी महिला मिळून आल्या.
तीन लाख रुपये किमतीचे तीन हजार लिटर कच्चे रसायन मिळून आले. बुधवारी (दि. २९) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ही कारवाई केली. पोलीस नाईक नवनाथ बाळासाहेब धायगुडे यांनी बुधवारी (दि. २९) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


















