न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिंचवड येथील एम्पायर इस्टेटमधील जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र येथे आज शुक्रवार (दि. १५) रोजी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नगरसेवक शैलेश मोरे व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व जेष्ठ नागरिक व आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरसेवक शैलेश मोरे यांच्या हस्ते वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.