न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- आळंदी रोड, दिघी येथील घराशेजारील गोट फार्ममध्ये शुक्रवारी पहाटे चार ते सव्वाचारच्या दरम्यान लाल रंगाच्या कारमधून तीन चोरटे आले. त्यांनी फार्मच्या दरवाजाचे कुलूप तोडून जाळी उचकटून आत प्रवेश केला.
साऊथ आफ्रिकन बोर, पंजाब बीटेल आणि बोर कोस जातीच्या पाच लाख ८० हजारांच्या पाच बक-या कारमध्ये घालून चोरून नेल्या. रविंद्र साहेबराव वाळके (वय ४८, रा. आळंदी रोड, दिघी) यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.