न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय शालेय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरूकप हॉकी स्पर्धेचे उद्घाटन उप आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
दि.८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२२ दरम्यान महापालिकेच्या मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी स्टेडीयम या ठिकाणी जिल्हा स्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन उप आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी क्रिडा अधिकारी अनिता केदारी, क्रिडा पर्यवेक्षक अनिल जगताप, पंच प्रमुख श्रीधरन तंबा, एडवर्ड डिसोझा, अरुण सिंग, निखिल जाधव, गायत्री लोढा, क्रिडा शिक्षक रवींद्र कांबळे, वैशाली साळी, बाळाराम शिंदे यांच्यासह खेळाडू, विद्यार्थी, प्रशिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.
१५ आणि १७ वर्षाखालील वयोगटामधील मुले मुली यांच्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये एकूण २३ संघांचा सहभाग आहे तर ३६१ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. महापालिकेच्या वतीने विविध खेळांना वाव देण्यासाठी तसेच शहराला क्रिडानगरी म्हणून नवी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी स्टेडीयम या मैदानावर तसेच शहरात भविष्यामध्ये अंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.