न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- काळेवाडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत फिर्यादी यांचा मुलगा गेला होता. मात्र, त्याने शुज घातले नसल्याने त्याच्या क्लास टिचरने त्याला शाळेतून हाकलून दिले.
शाळा सुटल्यानंतर फिर्यादी आपल्याला मुलाला घेण्यासाठी शाळेत गेले. मात्र, त्यांना त्यांचा मुलगा सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, अवघ्या दीड तासात मुलाचा शोध लागला. क्लास टिचरने वर्गातून हकलून दिल्याने मुलगा आपल्या मित्राच्या घरी जाऊन बसला होता, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकार शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजता घडला.