न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( ९ ऑगस्ट २०२२) :- रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने रविवार (दि. ७) रोजी पिंपरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तीन उल्हास जगताप, तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ १ मंचक इप्पर, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड रयत विद्यार्थी विचार मंच संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, रयत विद्यार्थी विचार मंच पदाधिकारी सदस्य मयूर जगताप ,अभिजित साळुंखे, समाधान गायकवाड , अभिजित लगाडे ,प्रीतम वाघमारे ,अतुल वाघमारे , विक्रांत शेळके ,योगेश कांबळे ,रोहित कांबळे , नीरज भालेराव ,महेश गायकवाड, गाझी शेख ,राहुल थोरात ,करणं शिंदे ,प्रमोद लोंढे ,आकाश गुंजाळ , किरण ओपले ,अजय यादव ,सागर गायकवाड ,भाग्यश्री आखाडे ,प्रगती कोपरे ,माधवी खरात, प्राजक्ता गायकवाड , प्रतिभा बनसोडे , त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर अकील मुजावर ,गुलाम मोहंमद शेख , फैयाज शेख , राम भंडारी , विनोद गायकवाड,रवी कांबळे , नितीन ओव्हाळ ,चंद्रकांत बोचकुरे , नितीन गवळी , विकास गायकांबळे , प्रसाद गायकवाड ,यासिन मणेरे उपस्थित होते .
अति. आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, विद्यार्थी हा देशाचा पाय आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी महानगरपालिकेने अनेक योजना केल्या आहेत. त्याचा लाभ विद्यर्थ्यांनी घेतला पाहिजे. उपलब्ध साधनांद्वारे आपण प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळवता येते. विद्यार्थ्यांनी चांगले मित्र निवडावे आणि व्यसनापासून दूर राहून प्रगती करावी.
पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले, प्रचंड इच्छाशक्ती असेल तर विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतो. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उच्च ठेवून मार्गक्रमण करून आपले ध्येय गाठले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कंफर्ट झोन मधून बाहेर निघून जिद्दीने ध्येयाचा ध्येयवेडे होऊन पाठलाग करावा. वेळेचे योग्य नियोजन करून ज्ञानर्जन करावे.
जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला संधी मिळते. आपण त्या संधीच सोन करणं आपल्या हाती असत. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारीकडे, व्यसनाकडे वळून आपले भविष्य अंधारात ढकलू नये. आपल्या कुटुंबाला, देशाला अभिमान वाटेल असे कार्य विद्यार्थ्यांनी करायला हवं.
आजचा विद्यार्थी उद्याचा देश घडवणारा घटक आहे. त्यांचा सन्मान करून त्यांना देशाच्या प्रगतीच्या प्रवाहात घेणे हा या मागचा उद्देश आहे, असे रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना महासचिव संतोष शिंदे, सूत्रसंचालन प्राजक्ता गायकवाड, आभार प्रगती कोपरे, संस्थेची भूमिका अभिजित साळुंखे, विक्रांत शेळके यांनी मांडली.















