न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- तळागाळातील वंचितांसाठी आणि गोरगरीबाच्या मुलाच्या शिक्षणासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने अतिश बारणे यांनी दाखवलेले उत्तरदायित्व खरोखरचे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अतिश बारणे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनास पवार यांनी हजेरी लावली. यावेळी बारणे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, विराज लांडे, वसंत बोराटे, शाम लांडे, विजय सस्ते, गणेश सस्ते, काळूराम सस्ते, मयूर कलाटे, विशाल जाधव, मयूर बारणे, प्रशांत मेदनकर, पांडुरंग बारणे, आनंदा बारणे तुकाराम बारणे आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.















