न्यूज पीसीएमसी नेटवर्क :
पिंपरी : घाटकोपर येथील भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिका सभागृहात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम कदम यांच्या निषेधाच्या मागणी करत चांगलाच गोंधळ घातला.
शिवसेनेच्या नगरसेविका मिनल यादव यांनी सुरूवातीलाच राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. कदम यांच्यावर सभागृहाच्यावतीने निषेध करण्याची त्यांनी मागणी केली.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी राम कदम यांच्या प्रवृत्तीचा धिक्कार व्यक्त करत निषेधाचा ठराव सभागृहात मांडला. मात्र त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला.
महापौर राहुल जाधव यांना ही निषेधाची मागणी सभागृहात करू नये असे वक्तव्य केले. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या डायसवर धाव घेतली.
















