न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रु.) :- नगरसेवक राहुल भोसले आणि नागरिक सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विठ्ठलनगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नगरसेवक राहुल जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप दहाडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर गवळी, शिवशंकर उबाळे, राम बनसोडे, तिम्माशेठ टाकळे, फारूक इनामदार, सचिन शिंदे, पांडुरंग डोंगरे, नवनाथ कांबळे, विनोद शिखरे, नितीन कसबे, चंद्रकांत लोंढे आदी उपस्थित होते.
पाकिस्तानविषयी चीड व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ‘भारत माता कि जय’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सर्वांनी काही वेळ मौन पाळून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.











