न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२२) :- स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर तिरंगा” अभियान राबविण्याबाबत जनतेला आवाहन केले आहे.
दरम्यान आ. लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर व राजदादा हेमंत तापकीर यांच्या हस्ते रहाटणी – काळेवाडी मधील १,५०० नागरिकांना मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून या अभियानात प्रभागातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील व्हावे, असे आवाहन तापकीर यांनी केले आहे.












