न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- अज्ञात व्यक्तीने दहाच्या दरम्यान दुकानात प्रवेश करत तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यांच्यात झटापट झाली, तरुणीने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला, दुकानाबाहेर जात काही अंतर पाठलागही केला. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तरुणी दुकानाबाहेर कोसळली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यातच तीचा मूत्यू झाला. पूजा देवी प्रसाद (वय-३२) असं हत्या झालेल्या महिला व्यवसायिकेचे नाव आहे. भोसरीतील ‘प्रगती कलेक्शन’ इथे आज सकाळी हा प्रकार घडला आहे. हल्ला केलेल्या व्यक्तीचा भोसरी पोलीस शोध घेत आहेत.












