न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- विविध बँकांचे एजंट फिर्यादीकडे वसुली कामासाठी आरोपी हा काम करत होता. फिर्यादीच्या सांगण्यावरून आरोपीने विविध बँकांची ११ लाख २५ हजार रुपये किमतीची सहा वाहने सीझ करून त्याच्या गावी ठेवली.
कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय ती वाहने आरोपीने परस्पर विकली. ते पैसे बँकेत जमा केले नाहीत. तसेच फिर्यादी यांनाही दिले नाहीत. फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपीने वाहने परत देणार नाही, असे म्हणत भांडण करून शिवीगाळ केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार जय गणेश व्हिजन आकुर्डी, वेळे, ता. वाई, सातारा येथे सन २०१८ ते १६ ऑगस्ट २०२२ या दरम्यान घडला.
संतोष लक्ष्मण काशीद (वय ४७, रा. संभाजीनगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र हनुमंत पवार (वय ४१, रा. वेळे, ता. वाई, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.












