न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- रावेत गावठाणातील सिद्धीविनायक गणेश मंदिराच्या बंद दरवाजाचा कड़ी-कोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली.
दानपेटीत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये होते, असे फिर्यादी नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. १७) रात्री ११.३० ते मंगळवारी (दि. १६) पहाटे ते ४.३० च्या सुमारास घडला.
धर्मराज मारुती शिंदे (वय ५९, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.












