न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२२) :- डांगे चौकातील एका घड्याळाच्या दुकानात फिर्यादी आणि त्यांचे पती बुधवारी (दि. १७) सायंकाळी घड्याळ दुरुस्तीसाठी गेले. घड्याळ दुरुस्त करून देतो. मात्र त्याचे बिल आणि वॉरंटी, गॅरंटी मिळणार नसल्याचे आरोपी दुकानदाराने सांगितले. तसेच फिर्यादीचे घड्याळ फेकून दिले. त्यामुळे फिर्यादी यांनी दुकानाचा फोटो काढला आणि त्या पुढील खरेदीसाठी गेल्या.
दुस-या दुकानात फिर्यादी खरेदी करत असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी फिर्यादींसोबत गैरवर्तन केले. फिर्यादीचे पती त्यांचे पाकीट काढत असताना त्यांचे पाकीट हिसकावण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. फिर्यादीला दुकानाच्या काउंटवर पाडले. त्यांनी फिर्यादीस त्यांच्या मोबाईलमधील फोटो डिलीट करण्याची धमकी देत पोलिसात गेल्यास बघून घेईन. पोलिसात तक्रार केली तर पोलीस माझे काहीही करू शकत नाहीत, अशी धमकी दिली.
५७ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















