न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२२) :- राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देहूत आज जगद्गगुरु संत तुकोबारायांचं दर्शन घेतलं. पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देहूत आले आहेत. तुकोबांच्या मुख्य मंदिरात भगतसिंग कोश्यारी यांचं टाळ, मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
यावेळी राज्यपालांनी स्वत: गळ्यात टाळ घेऊन भजन केलं. वारकऱ्यांसह टाळ आणि मृदंगाच्या गजरात राज्यपाल तुकोबांच्या नामघोषात तल्लीन झाले होते. त्यांनतर, त्यांनी शिळा मंदिरात जाऊन तुकोबांच दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच शिळा मंदिराच लोकार्पण सोहळा पार पडला होता.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तुकोबाराय हे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे विचार अखंडितपणे अंमलात राहतील, यात शंका नाही असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी काढले आहेत.
















