न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२२) :- वायसीएम हॉस्पिटल समोरून रविवारी (दि. २१) रात्री प्रवासी रिक्षात बसवत असताना फिर्यादीचा आरोपींसोबत वाद झाला. त्यातून आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीस मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ आला असता आरोपींनी त्यालाही सिमेंटच्या ब्लॉकने आणि बांबूने मारून जखमी केले. सिकंदर पंढरीलाल यादव (वय ३४, रा. एमआयडीसी भोसरी), संदीप पंढरीलाल यादव (वय २५) अशी जखमींची नावे आहेत.
सिकंदर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंकज खंडेतोड (वय २५, रा.घरकुल चिखली), भास्कर कदम, अतुल (पूर्ण नाव माहिती नाही), दगडी अण्णा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















