न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला बालके, दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
यात ज्येष्ठ नागरीक संघटना दरवर्षी समाज विकास विभागामार्फत भेट वस्तु देण्यात येतात. या शहरातील ज्येष्ठ नागरीक संघाना टीव्ही देण्यात यावा, अशी ज्येष्ठ महासंघाची मागणी होती. त्यानुसार ११६ ज्येष्ठ नागरीक संघाना आज गुरुवारी (दि. २५) रोजी मंगलसेना विरुगंळा केंद्रात टी.व्ही वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, पिंपरी चिंचवड महासंघाचे अध्यक्ष अरुण बागडे, महासंघाचे कार्यअध्यक्ष वृषाली मरळ, उपाध्यक्ष बी.आर.माडगुळकर तसेच मोठ्या संख्याने ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
यामधे ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर, ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी गाव, आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ, भोसरी दिघी रोड, ज्येष्ठ नागरिक संघ इंद्रायणी नगर बारगले, ज्येष्ठ नागरिक संघ, उत्तर नेहरू नगर, यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघ ढमाले, महात्मा ज्योतिराव फुले ज्येष्ठ नागरिक संघ, शाहू नगर, ज्येष्ठ नागरिक संघ, मोरवाडी. इ. ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
















