न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२२) :- सांगवीतीळ साईनाथ नगरमधील यशोदा पुरम या सोसायटीतील इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट फ्लॅटच्या खिडकीतून बाहेर पडत होते. त्यामुळे आग लागल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली.
त्यांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री पावणे बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. घरातील टीव्ही, फ्रिज, एसीसह फर्निचर खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.संबंधित फ्लॅटधारक कुटुंबासह बाहेर गेले होते. त्यावेळी आग लागली. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.















