न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२२) :- लग्नानंतर माहेरच्यांनी मुलीला नांदण्यास न पाठवता मयत पती व त्यांच्या घरच्यांची फसवणूक केली. तसेच मयत पतीवर खूनाचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला. उलटपक्षी पतीलाच नांदण्यास नकार देत घटस्फोट व पैशांची मागणी केली.
मयत पतीला १२ लाख रुपये देऊन घटस्फोट दे नाही तर तुझे हातपाय तोडून टाकेन, तसेच घरातील बाया माणसांनाही मारून टाकेन अशी धमकी आरोपीने दिली. ही घटना २ फेब्रुवारी २०२० ते २४ ऑगस्ट २०२२ या दरम्यान घडली. या मानसिक त्रासाला वैतागून २४ ऑगस्ट रोजी पटीने राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.
विशाल अंकुश डोंगरे (वय ३३ रा. मोशी) असे मयत पतीचे नाव आहे. पत्नी (वय २७ रा. दिघी), संदिप बाळू धेंडे (वय ३४) सासू (वय ५५), बाळू शंकर धेंडे (वय ६४), महिला आरोपी (वय ३१) सर्व राहणार पिंपरी यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.















