न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२२) :- नातेवाईकांना गावी जाणासाठी ट्रॅव्हल्समध्ये बसवण्यास फिर्यादी रविवारी रात्री गेले होते. नातेवाईकांना बसमध्ये बसवून पार्क केलेल्या कारकडे जात असताना आरोपी तेथे आले व त्यांनी त्यांच्या स्कॉर्पिओसारख्या गाडीत बसवून घातपात करण्याच्या उद्देशाने पळवून नेले.
आरोपींनी फिर्यादीचा ८ हजार रुपयांचा फोन घेतला व त्यांची पांढऱ्या रंगाची टुरीस्ट परमीट कार (एम एच १४ जी यु ९००४) ही ३ लाख रुपयांची कार देखील जबरदस्तीने घेऊन गेले. हा प्रकार निगडीतील पवळे ब्रीजजवळ रविवारी (दि. ४) रात्री आठ वाजता घडला.
अशोक सोमचंद जाधव (वय २५ रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. चार अनोळखी इसामांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.