न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२२) :- घरी जात असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी यांना हाताने, दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी फिर्यादी हे बिगारी कामगार आहेत.
आरोपी आणि फिर्यादी यांची पूर्वी भांडण झाले होते. हा प्रकार भोसरी येथील चक्रपाणी वसाहत गणेश भाजी मंडई समोर रविवारी (दि. ४) रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. किशोर दिलीप कसबे (वय २४ रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अवी रवि साखरे (वय १९), मोसीन शेख (वय २५), निखील गायकवाड (वय १९), प्रथमेश गायकवाड (वय २१), हरज्योत इंद्रजीत (वय २० सर्व रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.