न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२२) :- रिक्षात बसून आरोपींनी कासारवाडी ते सांगवी दरम्यान रात्रभर रिक्षा फिरवली. सांगवीतील माकन हॉस्पीटलजवळ रिक्षा थांबवून फिर्यादी रिक्षा चालकाला दमदाटी केली. त्यांच्या जवळचे एटीएम काढून घेऊन त्याचा पिन विचारून फिर्यादी रिक्षाचालकाच्या बँक खात्यातील ३ हजार रुपये काढून घेतले.
कासारवाडी मेट्रो स्टेशनजवळ रिक्षा न्यायला सांगून तेथे मारहाण करून फिर्यादीचा ६ हजार रुपयांचा मोबाईल व रोख रक्कम २ हजार रुपये असा एकूण ११ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. हा प्रकार रविवारी (दि. ४) मध्यरात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडला.
माधव मुकुंदराव घोरवडे (वय २५ रा. थेरगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वय वर्षे २७ ते ३० वर्षांच्या आतील तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.















