न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२२) :- पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी आरोपीला तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. तसेच त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. ५) सायंकाळी आळंदी रोड भोसरी येथील एका शाळेसमोरील मोकळ्या मैदानात सापळा लावून कारवाई केली. आरोपीकडून २०० रुपये किंमतीचा कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस शिपाई सचिन सातपुते यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक दिगंबर घोरपडे (वय २१, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.