न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. २० फेब्रु.) :- इक्रा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नेताजी काँग्रेस सेना व अभिनेता राष्ट्रीय अध्यक्ष रंगाशेठ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
भाजपा सचिव विशाल वाळुंजकर म्हणाले की, शिवाजी महाराजांनी ‘अठरा पगड जाती व बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजातील घटकांना न्याय देणारे राजे होते. त्यामुळेच शिवछत्रपतींना ‘सबका साथ, सबका विकास साधणारे जाणते राजे म्हणतात. छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा व स्वतःची आवड पाहून, त्या क्षेत्रात करिअर करावे, असे विशाल वाळुंजकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे महासचिव फिरोज मुल्ला यांनी शिवाजी महाराज यांच्या काळात मुस्लिम समाजाचे मावळे होते. त्यांचा इतिहास लोकांपर्यंत येत नाही, असे आपल्या भाषणात व्यक्त केले.
यावेळी नेताजी काँग्रेस सेना, राष्ट्रीय अध्यक्ष रंगाशेठ, भाजपा शहर सचिव विशाल वाळुंजकर, इक्रा स्कुल कमिटी अध्यक्ष उमेर गाजी यांच्या हस्ते अक्षर भरती स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा व उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष मजीद आत्तार, भाजपा अल्प आघाडी उपाध्यक्ष अमीर शेख, सलीम शेख, अल्ताफ पीरजादे, तेलीचरण सर, हनुमान चव्हाण, सुदर्शन सर, टीवकल फर्नांडिस, आस्विनी स्वामी, मौलाना आलीम, मौलाना खालिद व विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालीचरण पाटोळे, सूत्रसंचालन सलीम शेख यांनी तर आभार अंजुम इनामदार यांनी मानले.











