न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- पश्चिम महाराष्ट्रातील ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असून, बऱ्याच मुलांना ‘एमआयडीसी’त नोकरी लावल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले. नोकरी लावण्यासाठी चार ते पाच लाख रुपये घेतो, तुम्ही ओळखीचे असल्याने दोन लाखात नोकरीचे काम करून देतो, असेही सांगितले.
फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून, आरोपीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाला नोकरीला न लावता फसवणूक केली. हा प्रकार चिखलीत घडला.
सेवानिवृत्त पोलिस भगवान गेनू म्हस्के (रा. पंचवटी हौसिंग सोसायटी, शरदनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. संजय धोंडिबा पवार व ठकसेन धोंडिबा पवार (दोघेही रा. जेऊर, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.