न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- फ्री लायसिंग या लिंकवर क्लिक केले. त्यावर व्हाटसअप या ॲप्लिकेशनवर आपोआप मोबाईल क्रमांकावर मेसेज गेला. त्यावरून फिर्यादी यांच्या मोबाईलवर एक लिंक आली. त्यानंतर व्हाट्सअप द्वारे एका मुलीचा फोन आला. त्यावर लिंक रजिस्टर करून त्यावर पाचशे रुपये पाठविण्याबाबत सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी १ लाख ८८ हजार रुपये या लिंकवर पाठवले. त्यानंतर पाठवलेले पैसे फिर्यादीने पुन्हा मागितले असता, त्यांना पैसे मिळाले नाही. ही घटना तळवडेत घडली. पूनम हिरामण गीते (रा. देवी इंद्रायणी सोसायटी, देहू-आळंदी रोड, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे.