न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२२) :- चिटफंड कंपनीत गुंतवणूक करा चांगला डिव्हीडंट देतो, असे आमिष आरोपीने फिर्यादी आणि इतर सभासदांना दाखवले. त्यातून आरोपीकडे नागरिकांनी ८० लाख ७० हजार ६४७ रुपये ठेव ठेवली.
या ठेवी आरोपीने परत न देता पैशांचा अपहार करून फसवणूक केली. ही घटना फेब्रुवारी २०१९ ते १ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान एमआयडीसी भोसरी येथे घडली. कडवील मॅथ्यू बाबू (वय ७५, रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जेकब जॉर्ज (वय ५८, रा. बोपोडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.