न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व श्री दिनेश लालचंद यादव मित्र परिवाराच्या वतीने कुदळवाडीत रविवारी रात्री कोजागिरी पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. चंद्राच्या शीतल छायेत दुधाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती आयोजक माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी दिली.