न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- पुण्यातील आयआयबीएम कॉलेजमधील प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ यांना ५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लॉयल्टी अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर सर, सौ. शितलताई वर्णेकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वर्धापन दिनानिमित्त कु. प्रतिक्षा डफळ यांचा गौरव करण्यात आला. त्यांना पुढील जबाबदारी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर सर म्हणाले, कु. प्रतिक्षा डफळ यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यांचे काम कौतुकास्पद होते. त्यामुळे त्यांची लॉयल्टी अवार्डसाठी निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. कु. प्रतिक्षा डफळ यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून आर्थिक परिस्थितीचा विचार करून व विद्यार्थिनींबाबतीतले प्रश्न समजून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी न घाबरता संकटाना सामोरे कसे जावे? यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून विद्यार्थ्यांना परदेशापर्यंत नोकरी मिळवून दिली. मागील पाच वर्षापासून त्यांनी आयआयबीएम संस्थेसाठी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करून संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत अतिशय जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे.
आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी पुरस्काराबद्दल कु. प्रतिक्षा डफळ यांचे कौतुक केले. ते म्हणाले, एक मुलगी असूनही त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर संस्थेत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कामाची पावती म्हणजेच त्यांना मिळालेला लॉयल्टी अवार्ड आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित विभागप्रमुख अमोल भागवत, प्रा. अनिकेत वंजारी, संदीप जाधव, वेदांत कुलकर्णी, अनुभव वाजपेयी, एकता सिंग तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थापकांनी शुभेच्छा दिल्या.