- ” म्हणून आज उद्धव ठाकरेंवर वाईट वेळ ” – कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०२२) :- हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकाला स्वाभिमान शिकवला. हातात भगवा झेंडा घेऊन हिंदुत्वाचा विचार शिकवला. त्या पक्षाच्या पदाधिका-याला खासदारांना, आमदारांना जर काँग्रेसची विचारधारा जपण्याची शिकवण मिळत असेल तर, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाने प्रेरित झालेला शिवसैनिक ते कदापी सहन करणार नाही.
व्हिडीओ लिंक :- https://www.youtube.com/shorts/mCJeQeH1IKw
यामुळे ठाकरे यांच्यावर आज अशी वाईट परिस्थिती ओढवली आहे, असा टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला. ते काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये चोविसावाडी येथील डीपी रस्त्याबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजकांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी बोलत होते.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, शिवसैनिकाला, खासदारांना, आमदारांना व पदाधिका-यांना जय सोनिया… जय राहुल गांधी… जय शरद पवार… हे म्हणायला भाग पाडत असाल तर तो शिवसैनिक कदापी सहन करणार नाही. त्यामुळे अशी वाईट परिस्थिती निर्माण होते, अशी टिकाही त्यांनी केली.


















