- अव्वाच्या सव्वा पैशांची वसुली करूनही हात पाय तोडण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- बांधकाम व्यवसायासाठी फिर्यादी यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी सराईत गुन्हेगार दिपक वाल्मिक सूर्यवंशी (रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्याकडुन व्यवसायासाठी सन २०१५ मध्ये द.मा.द.शे १० टक्के व्याजाने ६,००,०००/- रुपये घेतले होते. ठरल्या प्रमाणे फिर्यादी यांनी व्याजाचे पैसे परत न केल्याने आरोपीने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन व्याजाचे पैसे न देण्याच्या कारणावरुन जिवे मारण्याची आणि हात पाय तोडण्याची धमकी दिली.
व्याज व चक्रवाढ व्याज असे एकुण २७,६०,००० रुपये वसुल केले. तसेच फिर्यादी यांच्या वडीलांचे नावे असलेले तीन फ्लॅट आरोपीने कागदपत्रे तयार करुन बळजबरीने नावावर करुन घेतले. तसेच पुन्हा २०,००,००० रुपयांची मागणी केली.
यावरून फिर्यादी यांनी आरोपी दिपक वाल्मिक सुर्यवंशी (रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) याच्या विरुद्ध (दि. ८) रोजी चिंचवड पोलीस स्टेशन गुरनं. ४७७/२०२२ भा.दं.वि.सं.कलम ३८६, ५०४, ५०६, सह महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ चे कलम ३९.४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष सह सावकारी कक्ष करीत असुन आरोपी यास अटक करण्यात आलेली आहे.
या आरोपी विरुध्द आधीही चिंचवड पोलीस स्टेशन गुरनं १५२/२०१० भा.द.वि. कलम ३०२,४५२,३६४ १४३, १४७, १४८, १४९, प्रमाणे, गुरनं ६९ / २०१८ भा.द.वि. कलम १६०, गुरनं ३१०/२०१५ भा.द.वि.कलम ३८७,५०६ सह महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ चे कलम ३९,४३,४४,४५ प्रमाणे गुन्हे दाखल असुन आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.
तसेच आरोपीप्रमाणेच व इतर सावकार ही सावकारी अवैध धंदा करुन कर्जदारास वेठीस धरुन व्याज, चक्रवाढ व्याज वसुल करत असतील तसेच सावकाराने अवैधरित्या कर्जदाराची मालमत्ता हडप करणे, कर्जावर अवास्तव दराने व्याज आकारणे, बळाचा वापर करणे, इतरही त्रास देणे, सावकारी लायसन्स व्यतिरिक्त अन्य रितीने सावकारीचा धंदा करत असेल तसेच बेकायदेशिर सावकारकी करीत असतील तर पोलिसात तक्रार देण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री. अकुंश शिंदे सोो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे सो, मा.पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), श्री. डॉ. काकासाहेब डोळे, सो., मा. सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे-०१) श्री. पद्माकर घनवट, सो.. मा.सहा.पोलीस आयुक्त श्री. डॉ.प्रशांत अमृतकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि (श्रेणी) विजय कांबळे, पोलीस अंमलदार महानोर, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, यांनी केलेली आहे.