न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- दसऱ्यानिमित्त फिर्यादी या गाडीची रेडियमने सजावट करीत होत्या. त्यांच्या गाडीच्या पुढे एम. एम. ०४ बी. यु.५७८७ क्रमांकाचा दुसरा ट्रक उभा होता. त्या दरम्यान एम.एच.१२ क्यु.डब्लु. ८६८९ टाटा स्टार या खाजगी बसने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत फिर्यादीच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली.
फिर्यादी तरुणी दोन्ही ट्रकच्यामध्ये सापडून गंभीर जखमी झाल्या. अपघातात त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना (दि. ५) सायंकाळी ५ ३० वाजता यशवंतनगर चौक, भोसरी टेल्को रोड चौकाच्या पुढे, के. एस. बी. चौकाच्या दिशेने जातांना सार्वजनिक रोडवर रस्त्यालगत डाव्या बाजुला घडली.
याप्रकरणी फिर्यादी रीकील वणेशा वलके (वय २० वर्ष रा. चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बसचालक सोपान भगवान माने (वय ६२ वर्षे, रा. बि.नं. १३, रुम नं. ४१६ नेहरुनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
















