- काळेवाडीतून सोळा लाखांचा माल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- काळेवाडी नढेनगर येथील रिजवान ड्रेसेस या दुकानात लेकि अँड को, केल्विन क्लीन, आदिदास, एजी नाईडडी, इनोव्हेट, सीव्ही अंडर आर्मर इंड व डी के एच सुपर ड्राईव्ह या कंपन्यांच्या बनावट लेबल व लोगोचा वापर करून तब्बल १५,७५,६५० किमतीचा माल तयार केला होता. तो पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिसांनी (दि ८) १३:३० वा. केली. आरोपींनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करून आर्थिक फायद्यासाठी आणि विक्रीसाठी त्याचा साठा करून ठेवला होता.
याप्रकरणी फिर्यादी नरेंद्र सिंग (वय ४४ वर्षे, रा. ई – १, लोअर ग्राउंड फ्लोअर, लाजपथनगर, दिल्ली) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार इम्रान युनुस शेख (वय ३३ वर्षे, रा. ओकांर कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), शिव भोले फॅशन (काली सडक, आनंदी पुरी कॉलनी, जलंधर बायपास जवळ, लुधीयाना, पंजाब) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी इम्रान युनुस शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















