न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- ‘ मला तुझ्याशी खाजगित बोलायचे आहे’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी महिलेला रॉयल सेव्हण हॉटेल येथे बोलावून घेतले. तिथे आरोपीने फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
‘ येथून पुढे मी सांगेल त्या इसमासोबत जावून तू त्याचे मर्जीनुसार शरीर संबध करायचे.’ मी सांगेल असे नाही केले तर, झाला प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या मुलांना संपवून टाकीन ‘ अशी धमकी दिली. फिर्यादी महिलेला आरोपीने त्याच्या इनोव्हा कार नंबर ३६३६ मध्ये बसवून मारहाण करून स्पाईन रोड येथे सोडून दिले.
हा प्रकार २७ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट २०२२ रोजी ४ च्या सुमारास रॉयल सेव्हण हॉटेल, दुर्गानगर, निगडी येथे घडला. ३६ वर्षीय पिडीत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किसन भानुदास शेळवणे (वय ४० वर्षे, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















