न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- प्रवासी वाहतूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादीने कार क्रमांक एम एच १४ जी एच ४६६१ या वाहनात पॅसेंजर भरले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीकडे जबरदस्तीने तीनशे रुपयांची मागणी केली. त्यास फिर्यादींनी विरोध केला असता ‘ तू आम्हाला विचारल्याशिवाय चिंचवड स्टेशन येथे पुणे- मुंबई अशी गाडी चालवायची असेल तर प्रत्येक खेपेस ३०० रुपये दे; जर तू पैसे नाही दिले तर तुला बघून घेईल ” अशी धमकी आरोपींनी फिर्यादीला दिली.
हा प्रकार (दि. ९) रोजी साडेअकराच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडला. या प्रकरणी संजय ज्ञानोबा वाघमारे (वय ४० वर्षे, रा. ओमसाई अपार्टमेंट फ्लॅट नं ४ निगडी गावठाण निगडी) यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार आरोपी विनोद ऊर्फ विन्या देवेंद्र कामत (वय ४२ वर्षे, रा. शिवकृपा कॉलनी, डॉ. देसाई शेजारी राममंदिर रोड त्रिवेणीनगर, तळवडे), उदय ऊर्फ सर्वोदय शेट्टी (वय ४८ वर्षे, रा संस्कृती अपार्टमेंट, फलॅट नं ए ४०४ आयडीबीआय बँक जवळ चिंचवड स्टेशन) यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.















