न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात अनुसूचित जाती जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी पुणे शहरात जावे लागते. अनेकांना ते शक्य होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थचे उपकेंद्र पिंपरी चिंचवड शहरात सुरू करणे गरजेचे आहे.
जेणेकरून शहरातील विद्यार्थी, युवक, शासकीय कर्मचारी आणि महिला यांना प्रशिक्षण, संशोधन तसेच लेखक व साहित्यिक यांना समतावादी विचाराचे साहित्याचे लेखन व साहित्य प्रकाशनाचे एक नवीन दालन सुरू होईल.
त्यासाठी शहरात बार्टीचे उपकेंद्र सुरु करावे, अशा आशयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष मयूर जगताप यांनी बार्टीच्या महासंचालकांना दिले आहे.















