- आकुर्डीतील घटना; पोलिसांकडून आरोपींना अटक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- सिध्दिविनायक ग्रुप कंपनीतील आरोपींनी तिप्पट रक्कम करून देतो, असे सांगत रियल इस्टेटच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणुक करण्यासाठी फिर्यादी यांना संगणमत करून अनसिक्युर्ड लोन काढायला लावले. फिर्यादीकडून (दि. १६/१०/२०१७ ते ०३/१२/२०१८) पर्यंत एकुण ८ टप्यामध्ये सिध्दिविनायक ग्रुप कंपनीच्या विविध बँक खात्यावर एकुण ६,३४,००,०००/- (सहा कोटी चवतीस लाख) रूपये घेतले. या रकमेचे व्याज फिर्यादीला भरायला लावले.
फिर्यादीच्या रकमेपैकी आरोपींनी दि. १०/०२/२०२१ रोजी फक्त ५०,००,०००/- रूपये फिर्यादी यांना परत केले. फिर्यादीची मुद्दल रक्कम ५,८४,००,०००/- रूपये ही आजपर्यंत साधारण व्याजासह आरोपी यांनी फिर्यादीला परत न देता आर्थिक फसवणुक केली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांना धमकाविले, असे फिर्यादेत म्हटले आहे.
हा प्रकार दि. १६/१०/२०१७ ते १२/१०/२०२२ रोजीप जय गणेश व्हिजन ऑफिस नं. २३०, दुसरा मजला ए विंग आकुर्डी येथे घडला. फिर्यादी मिलींद मधुकर चौधरी (वय ५१ वर्षे, रा. प्लॉट नं. १९८, से.नं. २७/अ, प्राधीकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कुंदन दत्तात्रय ढाके, एक महिला, सुनिल झांबरे, चंद्रशेखर अरूण चौधरी, पंकज प्रल्हाद चौधरी, किरण गिरीधर चौधरी, मुकेश अशोक कोल्हे (सर्व सिध्दिविनायक ग्रुप कंपनी, दुसरा मजला ए विंग आकुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी कुंदन ढाके वगळता सर्वांना अटक केली आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















