न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- महापालिकेच्या वतीने सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी एक याप्रमाणे आठ ठिकाणी कचरा संकलन ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येत आहेत.
निगडीतील सेक्टर क्रमांक २३ व नेहरूनगर, एमआयडीसीतील जे ब्लॉक येथील या दोन स्टेशनच्या कामासाठी ८ कोटी १२ लाख खर्च अपेक्षित आहे. घराघरातून जमा केलेला ओला व सुका कचराचे पुन्हा योग्यरित्या विलगीकरण करण्यासाठी पालिकेच्या वतीने कचरा ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येत आहेत. त्यासाठी स्थापत्य व विद्युतची कामे केली जाणार आहेत.
निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील गायरान जागेत आणि नेहरूनगर, एमआयडीसीतील जेब्लॉक येथे स्टेशन उभारले जात असून, त्यांची निविदा काढण्यात आली आहे. त्या दोन स्टेशनचा खर्च ८ कोटी १२ लाख इतका आहे. हे काम कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ला देण्यात आले असून, वर्क ऑर्डर १७ जानेवारी २०२२ ला देण्यात आली आहे. त्या कामासाठी सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेक प्रा. लि. ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या एजन्सीला एकूण २.२० टक्के शुल्क दिले जाणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.















