न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २५ फेब्रु.) :- मावळ परिसरात पार्थदादा अजित पवार युवा मंच व वरसुबाई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील सुमारे ११ गावांतील १७ संघाने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचा माजी रणजी क्रिकेट खेळाडू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांच्या हस्ते नुकताच उदघाटन समारंभ संपन्न झाला. ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व चालना मिळावी या उद्देशाने पार्थदादा युवा मंच व वरसुबाई मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास माळेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच राजेश कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गायकवाड, उद्योजक राजू भांडवलकर व सर्व ग्रामस्थ तसेच सहभागी संघ उपस्थित होते.











