- मोबाईल, रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- निगडी, पिंपळे निलख, दिघी येथे घरात शिरून अज्ञात चोरटयांनी मोबाईल, रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असताना अज्ञात इसमाने घराच्या पार्कींगमध्ये लावण्यात आलेले बंद स्थितीतील दोन सी.सी.टी.व्ही कॅमे-यावर काळया रंगाचा स्प्रे मारला. बिल्डींगच्या दुस-या मजल्यावरील फ्लॅटचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला. बेडरुममधील फर्निचरच्या कपाटातील ६,००,००० रूपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना (दि २८) रोजी रात्री १०:३० ते (दि २९) रोजी सकाळी ८.०० वा. च्या दरम्यान महादेव निवास, क्रांतीनगर, पिंपळे निलख येथे घडला. फिर्यादी सागर गजानन कामठे (वय ३७ वर्षे, रा.महादेव निवास, क्रांतीनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
फिर्यादीच्या रुमचा दरवाजा उघडा असताना फिर्यादीचा १०,००० रुपये किंमतीचा रेलमी कंपनीचा मोबाईल, फिर्यादीच्या मित्राचा १२,००० रु किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल तसेच एकाच ८००० किंमतीचा टेक्नो कंपनीचा मोबाईल व आणखी एकाचा ९००० किंमतीचा रेलमी कंपनीचा मोबाईल असे फिर्यादीसह त्यांच्या मित्राचे एकुण ३९,००० किंमतीचे एकुण ४ मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. हा प्रकार (दि.३०) रोजी सकाळी ६.०० वा ते ७.३० वा च्या दरम्यान प्लॉट न. ५४ स्किम न.३ से.न.२१ यमुनानगर, निगडी येथे घडला. फिर्यादी शुशांत बळवंत लोंढे (वय २१ वर्षे, रा.केअर ऑफ अजिक्य रामभाऊ उबाळे यांचे रुममध्ये भाड्याने प्लॉट न. ५४ स्किम न. ३ से. न. २१ यमुनानगर निगडी पुणे, मुळ पत्ता-रा. ईकुंडी ता.कागल.जि.कोल्हापूर) यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीच्या घरात उघडया दरवाजावाटे आत प्रवेश करुन अज्ञात चोरटयांनी २,५०,००० रू १०० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, ६२,५०० किंमातीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, १,२५,००० रूपये किं ५० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, १ ,२५,००० रूपये किमातीचे ५० ग्रॅम वजनाची पोत, १.२५,००० रूपये किं ५० ग्रॅम सोन्याची चेन, ५०,००० रोख रक्कम असे एकुण ७,३७,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरुन नेले आहेत. ही घटना (दि. २५) रोजी ८ ते (दि. २९) रोजी दुपारी ४०० च्या दरम्यान पीसीएमसीशाळेच्या पाठीमागे, नारायण स्मृती निवास, दिघी गावठाण येथे घडला. फिर्यादी सचिन नंदकुमार येळवंडे (वय ३७ वर्षे, रा. पीसीएमसी शाळेच्या पाठीमागे, नारायण स्मृती निवास, दिघी गावठाण) यांनी दिघी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















