न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिचवड सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या उपजत कालागुणांना वाव देण्यासाठी, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा वाढ़ीसाठी दिवाळी सुट्टीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १ व २ नोव्हेंबर रोजी रोबोट विषयावर कार्यशाळा तसेच गमतीशीर विज्ञान गणितावर आधारित कार्यशाळा होणार आहे. १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबर २०२२ व ४ नोव्हेबर ते ५ नोव्हेंबर २०२२ रोजी साहित्यमूल्य नोदणीसह सपन्न होणार आहेत. दि. ८ नोव्हेंबर रोजी दिसणारे खग्रास चंद्रग्रहाण दुर्बिणीव्दारे पाहण्याची संधी मिळणार आहे. दि. ३१ ऑक्टोबर २०२२ सोमवार रोजी तसेच दि. ७ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी पिपरी चिचवड सायन्स पार्क सुरु राहील.
कार्यशाळेसाठी नाव नोंदणी सायन्स पार्क कार्यालयात करता येईल. अधिक माहितीसाठी दरध्वनी क्र. ७७४४९४४३३३ तसेच ई-मेल pcsciencecentregmail.Com यावर संपर्क करावा, असे आवाहन प्र. मुख्य कार्येकारी अधिकारी, सायन्स पार्क यांनी केले आहे.















