न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- आज मंगळवार (दि. २६) रोजी पहाटे तीन वाजता भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घूसून जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. या कामगिरी निमित्त वायूसेनेचं सर्वत्र कौतुक केल आहे. पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने ही वायूसेनेचे अभिनंदन करत साखर वाटप करून जल्लोष करण्यात आला.
पिंपरीतील शगुन चौक या ठिकाणी वीर बजरंग बली हनुमान मंदीरात पुष्पहार अपूर्ण करून, शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने फटाक्यांची माळ वाजवुन व जल्लोष करून साखर वाटप करण्यात आली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, गोरख पाटील, मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाई सुरेश जोगदंड, अपना वतन संघटनेचे जितेंद्र जुनेजा, शहाजी गाडेकर, तेजस दाखले, प्रदिप दळवी, माऊली जाधव, दत्ता गिरी, रविकिरण घटकार, संदिप खुंटे, सागर शिंदे, दिपक कांबळे, दत्ताभाऊ क्षिरसागर, संतोष हिवाळे, शगुन चौक हॉकर्स अध्यक्ष पिंपरी राजेश मायारामन, नारायण खुशलानी, भाग्यश्रीताई मस्के, रत्नप्रभाताई नवगिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.











