न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर अज्ञात आरोपीने काळया रंगाचा स्प्रे मारला. दुस-या मजल्यावरील फ्लॅटचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला.
बेडरुममधील लोखंडी कपाटातील ३५,००० रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १५,००० रुपये किंमतीचे ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे तामण व १५,००० रु रोख रक्कम असा एकुण ६५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना (दि. ४) रोजी दुपारी दोन ते (दि. ६) रोजी दु १.०० वाजेपर्यंत फ्लॅट नंबर बी- २०३, लोटस अॅन्ड लिली सोसायटी, क्रांती नगर, रक्षक चौक जवळ, पिंपळे निलख येथे घडली.
फिर्यादी सागर रविंद्र घोलप (वय ४१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर बी- २०३, लोटस अॅन्ड लिली सोसायटी, क्रांतीनगर, रक्षक चौकजवळ, पिंपळे निलख, विनय जोशी यांच्या भाडयाच्या फ्लॅटमध्ये) यांनी सांगवी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















